Have a question?
name would you need a hardcopy of the certificate mailed to you ?
Delete file
Are you sure you want to delete this file?
Message sent Close

Foundation Vedanta Course Marathi

चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद यांनी वेदांताचा अभ्यास अगदी घरच्याघरी सुलभतेने होण्यासाठी एक अनोखी पद्धत सुरु केली. चिन्मय इंटरनॅशनल
फाउंडेशन (CIF) कडून हे धडे प्राथमिक वेदांत अभ्यासक्रम म्हणून उपलब्ध करून दिले आहेत. वेदांताच्या कालातीत तत्त्वज्ञानाची आपल्याला ओळख व्हावी व ते अमूल्य ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी आपल्याला सक्षम बनवणे हे या अभ्यासक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • Description
  • Curriculum
  • Reviews

FVC Marathi A5_page-0001

प्राथमिक वेदांत अभ्यासक्रम मराठीतून—ऑनलाईन पद्धत
चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद यांनी वेदांताचा अभ्यास अगदी घरच्याघरी सुलभतेने  होण्यासाठी एक अनोखी पद्धत सुरु केली. चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशन (CIF) कडून हे धडे प्राथमिक  वेदांत अभ्यासक्रम म्हणून उपलब्ध करून दिले आहेत. वेदांताच्या कालातीत तत्त्वज्ञानाची आपल्याला  ओळख व्हावी व ते अमूल्य ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी आपल्याला सक्षम बनवणे हे या अभ्यासक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती
अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि त्याचा लाभ

वेदांताचे तत्त्वज्ञान हे जीवनाला योग्य दृष्टी देते. मग तो व्यवसाय असो, कुटुंब असो किंवा परस्पर संबंध असो, जीवनातील कोणत्याही परिस्थितीला किंवा समस्यांना सहजतेने आणि कुशलतेने सामोरे जाण्याची क्षमता हे ज्ञान आपल्याला देते. विचारांची सुस्पष्टता आणि जीवनाबद्दलची सुयोग्य दृष्टी यामुळे मन:शांती लाभते व कार्यक्षम जीवन जगण्यास आपण सक्षम बनतो. अध्यात्म जाणण्यास आणि साधनेच्या मार्गावर प्रभावीपणे वाटचाल करण्यास आध्यात्मिक साधक समर्थ होतात.

अभ्यासक्रम पात्रता
वेदांत तत्त्वज्ञान जाणून घेण्याची आणि ते आपल्या जीवनात आचरणात आणण्याची मनापासून इच्छा असणारा कोणीही प्राथमिक वेदांत अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकतो. या अभ्यासक्रमासाठी संस्कृतचे ज्ञान आवश्यक नाही. हा केवळ अध्ययन विषयक अभ्यासक्रम नसून स्वतःमध्ये आंतरिक परिवर्तन घडवून आणणे हा याचा उद्देश आहे.

अभ्यासक्रमातील तपशील
ऑनलाईन प्राथमिक वेदांत अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे.
अभ्यासक्रमामध्ये एकूण २४ धडे (दरमहा २ धडे) आणि एकूण १२ वस्तुनिष्ठ प्रश्नावल्या आहेत. एका प्रश्नावलीमध्ये २ धड्यांचा समावेश आहे.
नोंदणीकृत विद्यार्थ्यांना लॉग-इन करण्यासाठी पासवर्ड दिला जाईल आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या लिंक दिल्या जातील.
तुम्ही आमच्या वेबसाइटवरून नोंदणी करू शकता. शुल्क प्राप्त झाल्यानंतर अभ्यासक्रमासाठी तुमची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
वेबसाइटवर लॉग-इन करा आणि नंतर ‘नोंदणी केलेले अभ्यासक्रम आणि अल्बम’ यामध्ये जाऊन  तुमचा अभ्यासक्रम सुरु करा.
प्रत्येक धडा डॅशबोर्डवर उपलब्ध केलेला आहे.  प्रश्नावली सोडवण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी धडा पूर्णपणे समजून घ्यावा.
प्रश्नावलीची उत्तरे पाठवल्यानंतर त्यांचे मूल्यमापन स्वतंत्र प्रणालीद्वारे केले जाते आणि गुण दिले जातात.
तुमची उत्तरे ऑनलाइन सादर केल्यानंतर, तुम्ही पुढील धड्यांमध्ये प्रवेश करू शकता.

अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांना चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख पूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या स्वाक्षरीचे ‘अभ्यासक्रम पूर्णता प्रमाणपत्र’ दिले जाईल. त्याची डिजिटल प्रत तुमच्या डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिली जाईल.

प्रमाणपत्रासाठी श्रेणीनुसार वर्गवारी
८०% आणि वर ‘अ+’ श्रेणी.
६०% आणि वर ‘अ’ श्रेणी.
५०% आणि वर ‘ब’ श्रेणी.
५०% च्या कमी ‘क’ श्रेणी.

‘घरच्याघरी अध्ययन’ अभ्यासक्रम शिष्यवृत्ती उपक्रम
ज्ञानदानाचे एक व्यासपीठ म्हणून, CIF ने नेहमीच सर्व प्रामाणिक साधकांसाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. जे विद्यार्थी, विशिष्ट अभ्यासक्रमासाठी उत्सुक आहेत, परंतु त्यांना अभ्यासक्रमाचे शुल्क भरण्यात अडचण येत आहे, ते संचालकांना तसा ई-मेल  homestudycourses@chinfo.org या पत्त्यावर पाठवू शकतात. त्यांच्या विनंतीची प्रामाणिकता, अभ्यासाची उत्सुकता आणि पात्रता यावर आधारित त्यांना अभ्यासक्रमासाठी नावनोंदणी करण्यासाठी  आर्थिक साहाय्य दिले जाईल. या अभ्यासक्रमासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी योगदान देऊन कोणीही या उदात्त उपक्रमाचा एक भाग बनू शकतो. अधिक जाणून घेण्यासाठी, संचालकांना ईमेल पाठवा: homestudycourses@chinfo.org

अभ्यासासाठी  मदत
CIF मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे अत्यधिक मूल्य आहे. अभ्यासादरम्यान, तुम्ही कोणत्याही टप्प्यावर अडखळत असाल तर आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोतच. अभ्यासक्रमात भाग घेताना तुम्हाला कोणत्या समस्या येत आहेत हे कृपया आम्हाला homestudycourses@chinfo.org या ई-मेलवर अवश्य कळवा आणि आम्ही या समस्येचे निराकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू.

संपर्क:
The Administrator – Home Study Courses
Chinmaya International Foundation, Adi Sankara Nilayam
Veliyanad, Ernakulam District, Pin – 682313, Kerala, India
Phone: +91-92077-11140 | +91-92077-11511
E-mail: vedantacourses@chinfo.org