Have a question?
name would you need a hardcopy of the certificate mailed to you ?
Delete file
Are you sure you want to delete this file?
Message sent Close

Drig Drishya Viveka: A Clear Path to Understanding the Self

The Seer and the Seen
Home > Blog > Drig Drishya Viveka: A Clear Path to Understanding the Self

दृक्-दृश्य विवेक: आत्मबोधाचा राजरस्ता

आपण आयुष्यभर बाह्य जगामध्ये सुख, शांती आणि आनंद शोधत असतो. परंतु, सनातन धर्माचे श्रेष्ठ तत्त्वज्ञान आपल्याला सांगते की, खऱ्या आनंदाचा स्रोत बाहेर नसून आपल्या आतच आहे. हाच आत्मबोध घडवून आणणारा आणि ‘मी कोण आहे?’ या मूलभूत प्रश्नाचे अत्यंत वैज्ञानिक व तार्किक पद्धतीने उत्तर देणारा श्रेष्ठ वेदान्त प्रकरण ग्रंथ म्हणजे ‘दृक्-दृश्य विवेक’.

हा ग्रंथ आद्य शंकराचार्य किंवा स्वामी विद्यारण्य (काही विद्वानांच्या मते भारतीतीर्थ) यांनी रचलेला असून, केवळ ४६ श्लोकांमध्ये संपूर्ण अद्वैत वेदान्ताचे सार यात साठवलेले आहे.

मुख्य सूत्र: ‘दृक्’ आणि ‘दृश्य’ यांतील फरक

या ग्रंथाच्या नावामध्येच संपूर्ण ग्रंथाचे रहस्य दडलेले आहे.

  • दृक्: पाहणारा, जाणणारा, साक्षी (द्रष्टा).
  • दृश्य: जे पाहिले जाते, जे जाणले जाते (भोग्य वस्तू किंवा विषय).

ग्रंथाची सुरुवात एका अतिशय सुरेख तार्किक श्लोकाने होते. त्यामध्ये द्रष्टा आणि दृश्याचा विवेक (निवड/फरक) खालील पायऱ्यांनी स्पष्ट केला आहे: १. डोळे आणि बाह्य जग: आपली रूपे, रंग आणि बाह्य वस्तू हे ‘दृश्य’ आहेत आणि त्यांना पाहणारे आपले डोळे हे ‘दृक्’ (द्रष्टा) आहेत. २. डोळे आणि मन: आपले डोळे कधी अंध होतात, कधी मंद होतात, तर कधी तीक्ष्ण असतात. म्हणजेच डोळ्यांची ही अवस्था बदलणारी (दृश्य) आहे आणि तिला जाणणारे आपले ‘मन’ हे ‘दृक्’ आहे. ३. मन आणि आत्मा: मनातील विचार, सुख-दुःख, राग-लोभ, संशय हे सर्व बदलत असतात. मनाच्या या सर्व अवस्थांना जे बदलत नसलेले तत्त्व जाणते, तो आपला ‘आत्मा’ किंवा ‘साक्षी चैतन्य’ आहे. हा आत्मा केवळ ‘दृक्’ (द्रष्टा) आहे, तो कधीही ‘दृश्य’ बनू शकत नाही.

प्रमुख विषय

  • चिदाभास: आपण शरीराला आणि मनालाच ‘मी’ समजतो, कारण आत्म्याचे चैतन्य मनावर प्रतिबिंबित होते.
  • माया: ‘आवरण’ (सत् झाकणे) आणि ‘विक्षेप’ (असत् खरे आहे असे भासवणे) या मायेच्या दोन शक्तींचे विवेचन.
  • षड्विध समाधी: मनाला स्थिर करण्यासाठी आणि आत्मस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सविकल्प आणि निर्विकल्प समाधींचे ६ प्रकार

ग्रंथ अभ्यासण्याचे फायदे- १. मनाची संभ्रमावस्था दूर होते: धकाधकीच्या जीवनात सुख-दुःखाच्या लाटांवर वाहत जाणाऱ्या मनाला हा ग्रंथ विचारांपासून अलिप्त होऊन ‘साक्षीभावाने’ जगायला शिकवतो. २. अत्यंत संक्षिप्त आणि सुटसुटीत: उपनिषदे किंवा ब्रह्मसूत्रे हे प्रचंड मोठे ग्रंथ आहेत. परंतु, जर अद्वैत वेदान्ताचा गाभा कमी वेळात समजून घ्यायचा असेल, तर ‘दृक्-दृश्य विवेक’ हा उत्तम प्रारंभ आहे. ३. तार्किक दृष्टिकोन: यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा किंवा केवळ अंधानुकरण नाही. बुद्धीला पटेल असाच तर्काधारित युक्तिवाद आहे. ४. आत्मिक शांततेचा मार्ग: ‘मी शरीर किंवा मन नसून, मी शुद्ध, बुद्ध, नित्य-मुक्त आत्मा आहे’ हा दृढ निश्चय या ग्रंथाच्या अभ्यासाने होतो, आणि त्यामुळे मनातील मृत्यूची भीती आणि चिंता कमी होते वा नाहीशी होते.

ह्या अभ्यासासाठी साहाय्यः ‘दृक् दृश्य विवेका’चा शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करण्यासाठी Chinmaya International Foundation (CIF) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यामधील स्वाध्याय सिरीजमध्ये स्व अभ्यासासाठी मदत उपलब्ध आहे. आणि अर्थातच तिथल्या पुस्तकाच्या दुकानात पुस्तकही मिळणारच.

– Uma Patki

Share

Leave a Reply