Have a question?
name would you need a hardcopy of the certificate mailed to you ?
Delete file
Are you sure you want to delete this file?
Message sent Close
New Course Launch – Kena Upanishad (Shankara bhashya) Click to Know More
Vedanta Vijnana Course – Click to Know More
Chinmaya Amrit Mahotsav - Global Sammelan - Click to Register Now

Sadhana Panchakam: A Step-by-Step Path to Spiritual Growth

The seeker’s path to spiritual growth
Home > Blog > Sadhana Panchakam: A Step-by-Step Path to Spiritual Growth

साधना पंचकम्: आध्यात्मिक प्रगतीचा सोपान

आदि शंकराचार्य विरचित ‘साधना पंचकम्’ हे वेदान्त अभ्यासाची आखीव रेखीव अशी वाटच आहे. यात केवळ ५ कडवी असली तरी, त्यात साधकासाठी अत्यंत पद्धतशीरपणे ४० सूचना  दिल्या आहेत. याला ‘सोपान पंचक’ किंवा ‘उपदेश पंचरत्नम्’ असेही म्हटले जाते, कारण यात पायरी-पायरीने साधक उन्नत कसा होत जाईल, याचे सोपे मार्गदर्शन केले आहे. यात ब्रह्मचर्याश्रमापासून ते संन्यासाश्रमापर्यंतच्या सर्व अवस्थांचा आणि ‘साधन चतुष्ट्य संपत्तीचा’ (विवेक, वैराग्य, शमादि षट् संपत्ती आणि मुमुक्षुत्व) समावेश होतो.

१. सुरुवातीची शिस्त (वेदाभ्यास आणि कर्मार्पण)
प्रगतीची पहिली पायरी म्हणजे वेदांचे नित्य अध्ययन आणि त्यानुसार कर्मांचे आचरण करणे. आपली सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून (ईश पूजन) काम्य कर्मांचा त्याग करावा. यामुळे अंतःकरणातील पापवासना (काम, क्रोध, लोभ, मोह इ.) नष्ट होतात आणि बुद्धी शुद्ध होते. विषयांच्या मोहात न पडता विवेकाने वागणे हीच खरी शिस्त.

२. सत्संग आणि गुरूउपसदन
लौकिक सुखाची दुसरी बाजू (दुःख) जाणून घेऊन, आत्मज्ञानाची इच्छा जागृत करणे महत्त्वाचे आहे. यासाठी कुसंग सोडून सत्संग धरावा आणि दृढ भगवद्भक्तीची कास धरावी. शमादि षट् संपत्ती वाढवून, विहित कर्मांचाही त्याग करत गुरूंना शरण जावे (गुरूउपसदन). गुरूंची अनन्य भावे सेवा करून त्यांच्याकडे ब्रह्मज्ञानासाठी प्रार्थना करावी.

३. श्रवण आणि मनन (आत्मचिंतन)
गुरूंकडून उपनिषदांचे श्रवण करावे आणि त्यावर सखोल मनन करावे. चुकीचे तर्क टाळून श्रुतींमधल्या विवेकाचा उपयोग करावा. ‘मी कोण आहे?’ यावर विचार करून ‘अहम् ब्रह्मास्मि’ (मी ब्रह्म आहे) या महावाक्यावर ध्यान केंद्रित करावे. बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या आत वळायला शिकणे हीच तिसरी पायरी आहे.

४. निदिध्यासन आणि जीवनातील उपयुक्त बदल
चौथ्या कडव्यातील उपदेश वैयक्तिक जीवनातही अत्यंत उपयुक्त आहेत. येथे ध्यान, निदिध्यासन आणि समाधी यातील सूक्ष्म फरक (प्रयत्न ते प्रयत्नशून्यता) समजतो.

  • व्यवहार: गर्व, अभिमान आणि देहबुद्धी सोडावी. विद्वज्जनांशी वाद टाळावा.
  • संयम: भुकेला व्याधी (आजार) समजून, अन्नाचे सेवन औषधाप्रमाणे करावे—सुग्रास अन्नाची अपेक्षा न ठेवता, जे मिळेल त्यात संतुष्ट राहावे.
  • तितिक्षा: शीत-उष्ण, सुख-दुःख, मानापमान सहन करण्याची शक्ती मिळवावी. वायफळ बडबड टाळून मौन पाळावे.


५.
अंतिम शांती आणि विरक्ती
एकांतात सुखासनावर बसून परमात्म्याचे ध्यान करावे. सर्वत्र परमात्मा बघून हे जग ‘आभासी’ आहे, असा अनुभव घ्यावा. एकदा का स्थिरता प्राप्त झाली की संचित कर्मे भस्मसात होतात आणि आगामी कर्मे नष्ट होतात. प्रारब्ध भोगत असतानाही नेहमी ‘अहम् ब्रह्मास्मि’ या आनंदमयी भावनेत स्थित राहावे.

साधना पंचकम् चा अभ्यासा का करावा?
जर आयुष्यात मानसिक शांती, विचारांची स्पष्टता आणि उच्च ध्येय गाठायचे असेल, तर हा ग्रंथ अभ्यासावाच लागेल. विचलित मन स्थिर करण्यासाठी आणि जीवनाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी हे ४० टप्पे म्हणजे मानवाचा ‘सामान्य जीव’ ते ‘ब्रह्मत्व’ पर्यंतचा एक विलक्षण प्रवास आहे.

ह्या अभ्यासासाठी साहाय्यः ‘साधना पंचकम्’ चा शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करण्यासाठी Chinmaya International Foundation (CIF) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यामधील स्वाध्याय सिरीजमध्ये स्व अभ्यासासाठी मदत उपलब्ध आहे. आणि अर्थातच तिथल्या पुस्तकाच्या दुकानात पुस्तकही मिळणारच.

Share

Leave a Reply