Have a question?
name would you need a hardcopy of the certificate mailed to you ?
Delete file
Are you sure you want to delete this file?
Message sent Close
New Course Launch – Kena Upanishad (Shankara bhashya) Click to Know More
Vedanta Vijnana Course – Click to Know More
Chinmaya Amrit Mahotsav - Global Sammelan - Click to Register Now

Tattvabodha: The Knowledge of Truth

Exploring the Foundations of Vedanta in Marathi
Home > Blog > Tattvabodha: The Knowledge of Truth

तत्त्वबोध: आत्मज्ञानाची गुरुकिल्ली

आदि शंकराचार्य विरचित ‘तत्त्वबोध‘ हा केवळ एक ग्रंथ नसून, आध्यात्मिक प्रवासाचा पाया रचणारा एक ‘प्रकरण ग्रंथ’ आहे. ज्यांना वेदान्तातील कठीण संकल्पना सोप्या भाषेत समजून घ्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा ग्रंथ म्हणजे एक वरदानच आहे.

हा संपूर्ण ग्रंथ आकांक्षा प्रक्रिया अनुसरून लिहिलेला आहे म्हणजे प्रश्नोत्तर स्वरूपाद्वारा.

प्रमुख वैशिष्ट्येः

  • अनुबंध चातुष्ट्य: ग्रंथारंभीच अधिकारी (मुमुक्षू), विषय (तत्त्वबोध), प्रयोजन (मोक्ष) आणि संबंध स्पष्ट करून वाचकाला ध्येयाची जाणीव करून दिली आहे.

  • साधनचतुष्ट्य – पात्रता आणि शिस्त: आत्मज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांचे (विवेक, वैराग्य, शमादी षट् संपत्ती आणि मुमुक्षुत्व) ह्यांचे अत्यंत नेमके विवेचन आहे. मनावर ताबा कसा मिळवावा आणि ध्येयावर लक्ष कसे केंद्रित करावे, याचे हे उत्तम मार्गदर्शन आहे.

  • ‘स्व’ची ओळख (आत्मविवेक): “जे माझे आहे, ते मी नाही” या साध्या सूत्रातून शरीर (स्थूल, सूक्ष्म, कारण), पंचकोश आणि अवस्थात्रयांच्या पलीकडे असलेला ‘मी’ म्हणजे ‘सच्चिदानंद आत्मा’ आहे, याचा उलगडा केलेला आहे.

  • सृष्टीची उत्पत्ती आणि विज्ञान: मायेपासून पंचमहाभूतांची निर्मिती आणि ‘पंचीकरण’ यांसारख्या प्रक्रियांतून हे ब्रह्मांड कसे बनले आहे, याचे तर्कशुद्ध आणि शास्त्रीय विवेचन दिलेले आहे.

  • जीव-ब्रह्म ऐक्य: ‘तत्त्वमसि’ या महावाक्याचा अर्थ सांगून, जीव आणि ईश्वर यांच्यातील उपाधी भेद दूर करून त्यांच्यातील मूळ चैतन्य एकच आहे, हे सिद्ध करून दाखवलेले आहे.

  • कर्ममुक्तीचा मार्ग: संचित, प्रारब्ध आणि आगामी अशा कर्मांच्या जाळ्यातून आत्मज्ञानाद्वारे कशी सुटका होते, याचे आश्वासक निरूपण केलेले आहे.

‘तत्त्वबोध’ का वाचावा?

जर जीवनातील मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील, म्हणजे— ‘मी कोण आहे?’ ‘हे जग काय आहे?’ आणि ‘दुःखातून कायमची मुक्ती कशी मिळेल?’ तर ह्या ग्रंथाचे वाचन अनिवार्य आहे.

हा ग्रंथ केवळ माहिती देत नाही, तर तो वाचकाला ‘जीवनमुक्त‘ होण्याच्या दिशेने नेतो. “तरति शोकमात्मवित्” – आत्मज्ञानी पुरुष सर्व दुःखाच्या पलीकडे जातो असे उपनिषदामधले विधान आहेच.

पारिभाषिक शब्दांच्या अचूक व्याख्या आणि प्रश्नोत्तर स्वरूपामुळे हा विषय अत्यंत क्लिष्ट असूनही, एखाद्या वाटाड्याप्रमाणे सत्याप्रत घेऊन जातो. आपल्या अस्तित्वाचे ‘सत्-चित्-आनंद’ स्वरूप जाणून घेण्यासाठी एकदा तरी तत्त्वबोधाचा अभ्यास नक्कीच करायला हवा.

त्यासाठी Chinmaya International Foundation (CIF) च्या अधिकृत वेबसाइट जर बघितलीत तर Basic  आणि Advanced अशा दोन्ही पातळ्यांवर कोर्सेस उपलब्ध आहेत. आपल्या क्षमतेनुसार योग्य तो कोर्स अभ्यासू शकता.

Uma Patki

Share

Leave a Reply