Have a question?
name would you need a hardcopy of the certificate mailed to you ?
Delete file
Are you sure you want to delete this file?
Message sent Close
New Course Launch – Kena Upanishad (Shankara bhashya) Click to Know More
Vedanta Vijnana Course – Click to Know More
Chinmaya Amrit Mahotsav - Global Sammelan - Click to Register Now

Atmabodha: The Knowledge of the Self

A Prakarana Grantha on Self-Knowledge and Vedanta
Home > Blog > Atmabodha: The Knowledge of the Self

शंकराचार्यांचा आत्मबोध’ हा वेदान्त शास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा, प्रेरणादायी आणि स्व-स्वरूपाची ओळख करून देणारा आणि सुबोध ‘प्रकरण ग्रंथ’ आहे. हा ग्रंथ केवळ तत्त्वज्ञानाची मांडणी करत नाही, तर तो आपल्या रोजच्या आयुष्यातील साध्या उदाहरणांतून तत्त्वज्ञानातले गूढ अर्थ समजावून सांगतो.

जर तुम्ही वेदान्ताचा अभ्यास करू इच्छित असाल, तर ‘आत्मबोध’ हा एक आदर्श आरंभबिंदू ठरू शकतो.

हा ग्रंथ वाचायला आणि समजायला का महत्त्वाचा आहे, हे त्याच्या पुढील वैशिष्ट्यांमधून आपल्याला समजून येईलः

१. संकल्पनांचे सुस्पष्ट निरूपण: अनेकदा ‘तत्त्वबोध’ सारख्या ग्रंथांमध्ये आपण वेदान्तातील तांत्रिक आणि पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या शिकतो. मात्र, ‘आत्मबोध’ हा त्या संज्ञांच्या पलीकडे जाऊन, वेदान्तातील सखोल संकल्पनांची प्रत्यक्ष जीवनातील वस्तूंच्या उदाहरणांद्वारा ओळख करून दिलेली आहे.  ६८ श्लोकांच्या या छोट्याशा ग्रंथात संपूर्ण वेदान्ताचे सार अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.

२. आगळेवेगळे मंगलाचरण: बहुतेक ग्रंथांच्या सुरुवातीला विशिष्ट देवतेची किंवा गुरूंची स्तुती असते, पण ‘आत्मबोध’ एक अपवाद आहे. यात कोणत्याही बाह्य देवतेला वंदन करण्याऐवजी थेट ‘आत्मन्’ (परब्रह्म) या सत्याचा उल्लेख आहे. आत्माच सर्वाधिक मंगल (शुभ) आहे, हे ह्यातून स्पष्ट होते.

दृष्टांतांची समृद्धी: ६८ श्लोकांच्या या छोट्या ग्रंथात, शंकराचार्यांनी प्रत्येक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी दिलेले साधे, पण खोल अर्थ असलेले दृष्टांत निवडले आहेत:

    • स्वयंपाकासाठी अग्नी: ज्ञानाचे साक्षात् साधन समजावण्यासाठी.
    • ढगांनी झाकलेला सूर्य: अज्ञानामुळे आत्मस्वरूपाचे होणारे आच्छादन दाखवण्यासाठी.
    • शिंपला आणि चांदी: भास आणि वास्तव यातला फरक समजण्यासाठी
    • सोने आणि दागिने: अधिष्ठान आणि नाम-रूप यांतील संबंध समजण्यासाठी आणि नाम-रूपांच्या पलीकडे असलेल्या मूळ तत्त्वाचा (सत्याचा) शोध घेण्यासाठी.
    • पाणी- बुडबुडे किंवा सूर्य-ढग: आत्मा आणि देहाचे वेगळेपण समजण्यासाठी.

३. व्यवहार आणि परमार्थ यांचा मेळ: पाण्यातले बुडबुडे, आकाश, तांदळावरचे फोलपट यांसारख्या रोजच्या जीवनातील उदाहरणांमुळे, ह्या ग्रंथाचे वाचन सहज सुबोध होते.

वाचकांसाठी आवाहन: ‘तत्त्वबोध’ हा जसा पारिभाषिक शब्दांचा पाया घालतो, तसा ‘आत्मबोध’ हा त्या संकल्पनांना प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर आणतो. जर संसारात राहूनसुद्धा, कर्माच्या बंधनातून मुक्त होऊन ‘स्व’रूपाची ओळख करून घ्यायची असेल, तर ‘आत्मबोध’ हा ग्रंथ तुमचा सोबती ठरेल.

केवळ ६८ श्लोक असलेला हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिनाच आहे. एकदा तरी हा ‘आत्मबोध’ वाचायला सुरुवात करा—कारण, स्वत:ची ओळख करून घेण्यासारखा दुसरा मोठा आनंद नाही! तुम्ही जर स्वतःच्या जीवनाचा उद्देश शोधत असाल किंवा ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शांतपणे आणि तर्काच्या आधारे शोधत असाल, तर ‘आत्मबोध’ नक्कीच तुम्हाला दिशा दाखवेल. हा ग्रंथ निव्वळ वाचनासाठी नसून, मननासाठी आहे.

आवाहन: केवळ ६८ श्लोकांचा हा प्रवास तुम्हाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्यासाठी पुरेसा आहे. जर तुम्हाला जीवनातील नित्य आणि अनित्य गोष्टींमधील फरक समजून घ्यायचा असेल, तर ‘आत्मबोधा’चा अभ्यास नक्की करा. त्याने निव्वळ बुद्धीला चालना मिळत नाही तर त्याच्यामधील मार्गदर्शनाने मानसिक शांतीही लाभते.

वेदान्ताच्या या अमूल्य प्रवासाची सुरुवात आजच ‘आत्मबोध’ वाचायला सुरू करून करा!

अधिक माहितीसाठी आणि स्व अभ्यासामध्ये मदत मिळवण्यासाठी Chinmaya International Foundation (CIF) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि त्यामधल्या स्वाध्याय सिरीजचा लाभ घ्या.

– Uma Patki

Share

Leave a Reply